आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस प्रक्रिया कंपनीला अाग, पाच जणांचा होरपळून मृत्यू, मृतांत विदर्भातील दोघे जण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे (तळेगाव)- चाकण रस्त्यावरील नाणेकरवाडी येथे टाकाऊ कापसावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यास गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अाग लागली. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश अाहे. शाॅर्टसर्किटमुळे ही अाग लागली असावा असा प्राथमिक अंदाज अाहे. रामदास पराश्रम राठाेड (वय ५२), उज्ज्वला िदलीप साेन्साळे (३५), कुसुम संदीप साखरकर (३०), कल्पना विजय शिरसाठ (२९) व राधा हरेश ठाकूर (२६) अशी मृतांची नावे अाहेत.

चाकणजवळील नाणेकरवाडी येथे सना एंटरप्रायजेस ही कंपनी अाहे. या ठिकाणी कापसावर प्रक्रिया केली जाते. रामदास मारुती कड यांच्या जागेत ही कंपनी असून कंपनीचे मालक माेहमंद अारिफ अब्दुल कलाम खान यांचे काॅटन वेस्टचे गाेडाऊनही या ठिकाणी अाहे. गुरुवारी सकाळी कामगार काम करत असतानाच, अचानक या कंपनीत अागीचा भडका उडाला. काही क्षणातच अागीने रुाैद्ररूप धारण केले. कंपनीच्या मागील बाजूस काम करत असलेल्या चार महिलांसह एक व्यक्ती अागीत अडकली, प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता येईना. काही वेळातच या पाचही जणांचा जळून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. अग्निशामक दलाचे पाच बंब, पाण्याचे पाच टँकर घटनास्थळी अाले. जवानांनी तातडीने अाग अाटाेक्यात अाणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताेपर्यंत कापूस पूर्णपणे खाक झाला हाेता. अाकाशात अागीचे व धुराचे लाेळ दिसत हाेते. जवानांनी ३० तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अाग अाटाेक्यात अाणण्यात यश अाले.

पुढील स्लाइडमध्ये, चालत्या बसने घेतला पेट...
बातम्या आणखी आहेत...