आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील शुक्रवार पेठेत आग; भिंत कोसळून 1 जण जागीच ठार, फायर ब्रिगेडचे 4 जवान जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील शुक्रवार पेठेत एका वाड्याला अचानक आग लागली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत वाड्याची भिंत कोसळली. यात प्रवीण बंसल (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.
 
कित्येक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तरीही, या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत जखमी झालेल्या अग्नीशमन दलाच्या 4 जवानांना तातडीने येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...