आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे धर्मशाळा झाली आहे, सरकार आता तरी धडा घेणार का - विरोधी पक्षाचा सवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यात चार ठिकाणी स्फोट झाल्याचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. स्फोटासंदर्भात माहिती देताना शिंदे म्हणाले, 'या स्फोटांची तीव्रता जास्त नव्हती. या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे. दिल्लीतून राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयई) टीम विमानाने पुण्याला रवाना झाली आहे. ते घटनास्थळी जाऊन माहिती घेणार आहे.'
विशेषम्हणजे गृहमंत्री आज एका कार्यक्रमासाठी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात येणार होते. मात्र, स्फोटा आधीच त्यांचा दौरा रद्द झाला होता.
दरम्यान, पुण्यातील स्फोट अतिरेकी हल्ला नसल्याचे पुणे पोलिस म्हणत असले तरी, केंद्रीय गृहसचिव
आर .के.सिंह यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.
हलक्या स्वरुपाच्या पाच स्फोटांनी पुणे हादरले; एक जिवंत बॉम्ब निकामी
कारमध्ये संशयास्पद स्फोट, 3 ठार 4 जखमी
वसईत स्फोट; तीन महिलासह एक जखमी