आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे धर्मशाळा झाली, सरकार आता तरी शहाणे होणार का - विरोधीपक्षाचा सवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहरात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज पुण्यात येणार होते आणि त्याच वेळी पुण्यात स्फोट होत आहेत हा काही योगायोग वाटत नाही. दहशतवाद्यांकडून जाणिवपूर्वक केलेले हे कृत्य वाटत आहे.' यातून तरी सरकार धडा घेणार आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जेल मध्ये असलेल्या अजमल कसाब आणि अफजल गुरुला आता तरी फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली.
सध्या सणांचा काळ सुरु आहे. लवकरच गणपती उत्सव येणार आहे. पुण्यात गणपती उत्सवची मोठी धुम असते. अशा काळात स्फोट होत असल्यामुळे पोलिस काय करत आहेत असाही सवाल खडसेंनी उपस्थित केला.
जर्मन बेकरी स्फोटानंतर आता कोंढवा परिसर दहशतवाद्यांचे निवासस्थान झाल्याचे ते म्हणाले.

पुण्यात पोलिस आहेत की नाही ?
भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विकास मठकरी म्हणाले, पुण्यात झालेल्या चार स्फोटानंतर पुण्यात पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही असा प्रश्न पाडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती होती. ज्या जंगली महाराज रोडवर स्फोट झाला तेथूनच मिरवणूक जात होती. मात्र, स्फोटांची तीव्रता कमी असल्यामुळे त्यांचा आवाज आला नाही आणि मिरवणूकीतील कोणालाही इजा पोहचली नाही. असेही त्यांनी सांगितले.
मठकरी म्हणाले, उद्या (गुरुवार) राखी पौर्णिमेचा सण आहे, त्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोक एकमेकांना फोन करुन सुरक्षिततेची खात्री करुन घेत आहेत. मठकरींनी लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि एकजूटीने राहावे असे आवाहन केले आहे.
हलक्या स्वरुपाच्या चार स्फोटांनी पुणे हादरले; दोन जिवंत बॉम्ब निकामी
PHOTOS : चाळीस मिनिटात झाले चार स्फोट
गृहमंत्री शिंदेचे शांततेचे आवाहन; अतिरेकी हल्ला नाकारता येत नाही - केंद्रीय गृहसचिव