आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : हौदात \'श्रीं\'च्या विसर्जनास काही संघटनांचा विरोध, नदीपात्रात विसर्जनाचा आग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
्री गणेशाचा अनादर सहन करणार नाही, असे फलक घेऊन उभ्या महिला. - Divya Marathi
्री गणेशाचा अनादर सहन करणार नाही, असे फलक घेऊन उभ्या महिला.
पुणे - पुण्यात गणपती विसर्जनाच्या ठिकाणी हौदात विसर्जन करण्याचा आग्रह धरणारे आणि त्याला विरोध करणारे असे दोन्ही गट पाहायला मिळत आहेत. घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी एका हौदाची निर्मिती करण्यात आली असून त्यात विसर्जन करु नये असे फलक घेऊन काही महिला आणि तरुण उभे आहेत. ते कोणत्या संघटनेचे आहेत याचा फलकांवर उल्लेख नाही.
काय आहे प्रकरण
- पुण्यातील श्रींच्या विसर्जनासाठी अलका टॉकीज चौक येथील घाटा जवळ एका छोट्या हौदाची निर्मीती करण्यात आली आहे.
- घरगुती आणि छोट्या मंडळांच्या श्रींच्या विसर्जनासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण रक्षणासाठी हा हौद तयार करण्यात आला आहे.
- मात्र काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन हौदात विसर्जनास विरोध केला आहे.
काय लिहिले आहे फलकावर
- कृत्रिम हौदाच्या समोर महिला उभ्या असून त्यांच्या हातात हौदात विसर्जनास विरोध करणारे फलक आहेत.
- त्यावर लिहिले आहे, 'पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली केवळ हिंदूंच्याच सणांना विरोध करण्यामागील षडयंत्र ओळखा.'
- 'श्री गणेशाचा अनादर सहन करणार नाही.'
- यालाच समांतर तरुण - तरुणी पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम हौदात विसर्जन करण्याची विनंती करीत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रींचा अनादर सहन करणार नाही म्हणणारे फलक घेऊन उभे कार्यकर्ते
बातम्या आणखी आहेत...