आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: गणराय येताच अवघे पुणे चैतन्यमय, पुढील 9 दिवस मांगल्याचा उत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या श्री गणेशाची भव्य मिरवणूक शुक्रवारी काढण्यात आली)
पुणे- ढोल-ताशे-बँड-लेझीमयांच्या घोषात आणि बाप्पा मोरयाचा गजर करत शुक्रवारी राज्यभरात श्रीगणरायाचे मंगलमय आगमन झाले. सार्वजनिक मंडळाच्या गणेशांची प्रतिष्ठापना सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती, तर घराघरांतील गणराय मात्र मध्यान्हापूर्वीच विराजमान झाले होते. गणेश चतुर्थीपासून सुरू झालेल्या या उत्सवात आता पुढचे नऊ दिवस रंगून जातील.
लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सर्व तयारी गुरुवारीच पूर्ण झाली होती. सजावटीचे साहित्य, फुले, हार, गजरे, बाप्पांचे लाडके कमळ, दूर्वा, पत्री, जानवे, निरनिराळी मखरे, आसने, सर्व प्रकारचे अलंकार, रोषणाईसाठी माळा..आणि पूजेचे साहित्य अशी खरेदी दिवसभर सुरू होती. उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सीसीटीव्हीही कार्यरत होते.
मानाच्या गणेशांची प्राणप्रतिष्ठा- पुण्यातील मानाच्या पाचही गणेशांची प्राणप्रतिष्ठा मिरवणुकांनी झाली. ग्रामदैवत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे मानाचे पाचही गणपती मंत्रघोषात विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची मिरवणूक फुलांच्या रथातून निघाली.
स्वागताला वरुणराजाही- शहर परिसरात गणरायांच्या स्वागतासाठीही गुरुवारपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारीही दिवसभर वरुणराजा बरसत होता. पण कार्यकर्त्यांचा उत्साह अजिबात कमी नव्हता. पावसाचा जोर कमी होताच पुन्हा जोशात ढोल-ताशे घुमत होते.
पुणे गणोशोत्सवाचे आणखी छायाचित्रे पाहा पुढे....