आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पुण्यात गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पर्यटकांची वाढू लागली गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात गणेशोत्सवाला आता हळू हळू रंग येऊ लागला आहे. काही मंडळांनी सोमवार रात्रीपासून देखावे खुले केल्याचे चित्र आहे. याचबरोबर गणेशभक्त व पुण्याबाहेरून येणा-या पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे. अजूनही काही गणपती मंडळे गणेशाच्या सजावटीतच गुंतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी देखाव्यांचे काम सुरु आहे.
अनेक मंडळांनी यंदा जिवंत देखाव्याचे नियोजन केले आहे. असे असले तरी माळीण दुर्घटनेसह, पाणीबचत, तरूणाईत वाढत चाललेली व्यसनाधिनता, स्त्री भ्रूण हत्या आदी सामाजिक विषयाला मंडळांनी हात घातलेला आहे. ज्या मंडळांचे जिवंत देखावे त्यांनी समाजप्रबोधनांचे विषय हाती घेतल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार रोज वेगवेगळ्या विषयांवर देखावे सादर केले जाणार आहेत. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांनी फुलांची आकर्षक सजावटीबरोबर विद्युत रोषणाई, समाजप्रबोधनावर देखाव्यांवर भर दिला आहे.
गौरी आज घरोघरी- आज घरोघरी गौरीचे आगमन होत आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत महिलांना गौरी आवाहन करावे असे ज्योतिषांनी म्हटले आहे. अनुराधा नक्षत्रावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत महिलांना आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार गौरी आवाहन करता येणार आहे. आज वैदृती आणि भद्रा योग आहे तरीही नक्षत्र प्रधान पूजा करावी, असे ज्योतिषांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात विविध पद्धतीने गौरी बसविण्यात येतात. कोकणात गौरी म्हणून पाच खड्यांची पूजा करण्यात येते, तर अनेकांकडे धान्याच्या राशी किंवा सुगड्यावर महालक्ष्मी बसविण्यात येतात. आज गौरीचे आगमन झाल्यानंतर दुस-या दिवशी गौरी पूजन करून नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनाच्या दिवशी विविध पालेभाज्या, कोशिंबीर, भात व गोड पदार्थ अशा स्वरूपाचा आपापल्या पद्धतीनुसार नैवेद्य दाखवावा. त्यानंतर परवा (गुरुवारी) मूळ नक्षत्रावर दुपारी चार वाजेपर्यंत गौरी विसर्जन करावे, असे म्हटले आहे.
पुढे पाहा, पुण्यातील विविध गणेश मंडळाचे देखाव्याची छायाचित्रे...