आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लाडक्या गणरायाला पुण्यात भावपूर्ण निरोप; यंदा 27 तास चालली मिरवणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या गणरायाने दहा दिवसांचा मुक्काम केल्यानंतर ठिकठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. पुण्यात सोमवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेली मिरवणूक आज (मंगळवारी) सकाळी 11 वाजता संपली. सुमारे 26 तास 40 मिनिटांपेक्षा जास्त चाललेल्या या मिरवणुकीतील ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण पुणे शहर दणाणून गेले होते. गणेशभक्तांच्या उत्साहालाही उधाण आले होते तसेच अबाल-वृद्धांसह बच्चे कंपनीनेही मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
पुण्यातील मनाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर रात्रीच्या मिरवणुका विद्युत रोषणाईमध्ये मार्गस्थ होत होत्या. पहाटेच वरुणराजाने हजेरी लावली होती. त्यावेळी मंडईचा गणपती विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ झाला होता. तर, दगडूशेठ हलवाई मंडळाचा गणपती 6 वाजल्यानंतर अलका टॉकीज चौकात पोहचला. तेथे महापौर चंचला कोद्रे यांनी दगडूशेठ गणपती मंडळाचे स्वागत केले. त्यानंतर सकाळी सात वाजता डेक्कन विसर्जन घाटावर दगडूशेठ गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान, मानाच्या पाच व दगडूशेठ गणपतीचे विसर्जन झाल्यानंतरही सकाळी 11 पर्यंत छोट्या-मोठ्या मंडळाच्या गणरायांचे भक्तीभावाने मिरवणूक काढून विसर्जन सुरुच होते. अखेर सकाळी 11 वाजता मिरवणूक संपल्याचे जाहीर करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा मिरवणुकीचे खास छायाचित्रे...