आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune German Bakery Blast Case Accused Arrested From Kolkata

जर्मन बेकरी स्फोट: स्फोटके पुरविणारा झाहिद हुसेनला कोलकात्यात अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 13 फेब्रुवारी 2010 रोजी पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी मदत करणारा संशयित दहशतवादी आरोपी झाहिद हुसेनला कोलकाता एसटीएफने आज अटक केली. झाहिदने पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी स्फोटके सप्लाय केल्याचे महाराष्ट्र एटीएसचे म्हणणे आहे. झाहिद बांग्लादेशी नागरिक आहे त्याला आज कोलकात्यात रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाहिद मागील काही दिवसापासून देशातील अनेक शहरात फिरत आहे. वेगवेगळ्या शहरांत फिरण्यामागे त्याची खेळी असू शकते. शहरांची रेखी करून त्यानुसार हल्ल्यांचे नियोजन तो करू शकतो असे एटीएसला वाटत आहे. बांग्लादेशातून तो कोलाकात्यात येतो व तेथून तो भारतभर फिरतो. झाहिद महाराष्ट्र एटीएसह राष्ट्रीय सुरक्षा यत्रंणा एनआयएला तो हवा होता. झाहिद कोलकात्याला येत असल्याची मिळताच एनआयए व इतर यत्रंणाद्वारे त्याला कोलकाता एसटीएफने पकडले. आता एनआयए लवकरच त्याला रिमांडवर घेईल.
पुण्यातून दोघांना अटक- पुणे शहरात काही आतंकवादी कारवाया होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएसने बुधवारीच दोघांना अटक केली आहे. एटीएसने त्याच्याकडून एक कार्बाइन, तीन पिस्टोल, मॅग्झीन व मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. ही कारवाई मिरज-म्हैसाळ रोडवरील राजेश पेट्रोलपंपाजवळ करण्यात आली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, हे आरोपी पिस्टोल व इतर साहित्य विकण्यासाठी आले होते.
पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतरचे छायाचित्र (फाइल फोटो)