आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Girls Student Organic Farming Study In Summer Vacation At Israel

पुण्याच्या या भगिनींचा इस्रायल, जपानमध्ये सेंद्रिय शेती अभ्यास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सुटी लागली की फिरायला जाणे हा रुळलेला ट्रेंड, पण आपले फिरणे फक्त करमणूकप्रधान पर्यटन ठरू नये, त्यापेक्षा काहीतरी वेगळे, हटके आणि सकारात्मक असावे, या हेतूने दोन पुणेकर युवतींनी सुट्टीत चक्क मध्यपूर्वेतले इस्रायल आणि पूर्वेकडचे जपान गाठले आणि सुटीच्या काळात स्थानिक शेतकरी कुटुंबासोबत राहून ‘स्वयंसेवकगिरी’ अनुभवली. सुटीचा हा कालखंड एक अनोखा अनुभव घेऊन आला, असे या दोघींनी सांगितले.

निसर्गप्रेमाचे संस्कार घरातूनच लाभलेल्या या युवती म्हणजे दीपांकिता (दिप्ती) आणि नृपजा भिडे. दीपांकिता सीएच्या शेवटच्या टर्मला आहे, तर नृपजाने नुकतीच अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. अभियांत्रिकीमध्येच तिला पदव्युत्तर पदवी मिळवायची आहे. पण दोघी बहिणींनी आपली सुटी सार्थकी लावण्यासाठी बरेच पर्याय शोधले.

दिपांकिता म्हणाली, इंटरनेटच्या माध्यमातून वुफबाबत (wwoof - वर्ल्डवाइड अपाॅर्च्यूनिटी ऑफ ऑर्गेनिक फार्मिंग) माहिती मिळाली. जगातील सुमारे १०० देश याचे सदस्य आहेत. सेंद्रीय शेती करणारे यजमान (होस्ट) आणि त्यांच्या शेतावर काम करू इच्छिणारे पाहुणे (गेस्ट) असे सर्वजण तिथे पर्याय शोधू शकतात. मी ईस्राईलची निवड केली, तर नृपजाने जपान निवडले होते.
सीए दीपांकिताने सुटीत केली इस्रायलच्या शेतीत कामे
दीपांकिता सांगत होती, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी व्यवस्थापन हे माझ्या आवडीचे विषय आहेत. यात इस्रायल हा चिमुकला देश अादर्श आहे. त्यामुळे मी तेथील होस्ट शोधले. अडीच महिने एकाच होस्टकडे न राहता मी १५ दिवस द अर्बन फार्म बोर्डिंग स्कूल, किबुत्स हाईफ, मोशाव नाहालाल आणि अवी आराझुनी एझुझ असे चार हाेस्ट शोधले. इंटरनेटवरून सर्व संवाद झालेला होताच. त्यामुळे मी थेट या होस्टकडेच गेले. परिचय झाल्यावर घरातील कामाच्या पद्धती समजून घेऊन मग शेताला भेट दिली.

पुढील स्लाइडवर वाचा, इंजिनिअर नृपजा भिडेने निवडले जपान


समूहशेतीचा प्रकार, इस्रायलची वैशिष्ट्ये
इस्रायलच्या शेतीबाबत दीपांकिता सांगते की, किबुत्स हाईफ हा वैशिष्ट्यपूर्ण इस्रायली कृषीप्रकार आहे. त्यास समूहकृषी म्हणता येईल. जगात इस्रायलमध्येच आढळणारा मोशाव नाहालाल हा प्रकारही वेगळाच.इजिप्तच्या वाळवंटालगत ओअॅसिससारखी ही जागा होती. तेथील वास्तव्य अनुभवले.

भांडी, झाडझूडीसह शेतीतील कामे केली
इस्रायलला जाण्याआधीच काय काम करावे लागणार याची माहिती घेतली होती, असे सांगून दीपांकिता म्हणाली, कोणाही होस्टकडे मोलकरीण नव्हती. घरातील लोकच कामे करत. मीही भांडी घासणे, केर काढणे, फरशी पुसणे ते शेतमाल उतरवण्यापर्यंतची कामे केली, असे दीपांकिताने सांगितले.

या स्वयंसेवकगिरीने हे दिले...
एकटीने कुठेही फिरण्याचा, राहण्याचा
आत्मविश्वास, संवादावर सर्वाधिक भर
योग्य तिथे यंत्र-तंत्राची मदत, जास्तीत
जास्त निसर्गपूरक जगण्याचा प्रयत्न
रासायनिक खतांना नकार, स्वयंशिस्त,
वेळेची काटेकोरता, जबाबदाऱ्यांचे भान
मातीत काम, गाडीतून मालाची चढउतार,
पॅकेजिंग, विक्री व बाजारपेठांची माहिती