आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'पदवीधर\'मध्ये पुणे, नागपूर भाजपकडेच, मराठवाड्यात राष्ट्रवादीचे चव्हाण विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आपला गड कायम राखत विजय खेचून आणला आहे. पुण्यातून चंद्रकांत बच्चू पाटील यांनी सलग दुस-यांदा बाजी मारली आहे तर नागपूरमधून अनिल सोले यांनी विजय खेचून आणला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतिश चव्हाण यांनी दुस-यांदा विजय मिळवला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी विजय खेचला आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवे आमदार म्हणून शिक्षक आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे विजयी झाले आहेत.
पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील यांचा 2380 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार अरूण लाड यांनी चाळीस हजारांच्या घरात मते घेतल्याने सारंग पाटील यांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पाटील यांना 1 लाख 52 हजार 411 मतांपैकी 61453 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या सारंग पाटलांना 59073 मते मिळाली. अरूण लाड यांनी 40 हजारांच्या घरात मते घेऊनही सारंग पाटलांनी भाजपच्या उमेदवाराला जबरदस्त लढत दिली. लाड यांनी घेतलेली मते विचारात घेण्यासारखीच आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीने ही जागा योग्य समन्वय न राखल्याने व नेतृत्त्वाने उमेदवार लादल्याने गमावली आहे.
पुणे पदवीधरमध्ये पहिल्या पसंतीचा कोटा 76,201 मतांचा होता. मात्र, हा आकडा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नव्हता. त्यामुळे दुसरी व तिस-या फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली. पहिल्या फेरीत भाजपच्या पाटील यांना 51, 711 मते तर, राष्ट्रवादीच्या सारंग पाटील यांना 44, 770 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार अरूण लाड यांना लक्षणीय अशी 32, 876 मते मिळाली होती. पहिल्या फेरीत भाजपच्या पाटलांनी 7716 मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. त्यामुळे दुस-या फेरीत भाजपचे पाटील आणखी आघाडी घेऊन विजय खेचतील असे वाटत होते. मात्र, सारंग पाटील यांना सातारा-कोल्हापूर पट्ट्यात चांगली मते मिळाल्याने भाजपच्या पाटील यांची आघाडी कमी केली. मात्र, तुल्यबळ लढतीत भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी 2380 मतांनी विजय खेचून आणला.
शिक्षक मतदारसंघातून सोलापूरचे अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी अनपेक्षितपणे विजय खेचून आणला. शिक्षक मतदारसंघासाठी 38, 952 जणांनी मतदान केले होते. त्यामुळे पहिल्या पसंतीचा कोटा 19, 428 इतका होता. तो पहिल्या फेरीत कोणालाही गाठता आला नाही. मात्र विद्यमान आमदार भगवानराव साळुंके यांच्यापेक्षा 2, 600 मतांची आघाडी घेत सावंत यांनी धक्का दिला. सावंत यांना पहिल्या फेरीत 8, 800 मते मिळाली. तर साळुंके यांना 6, 500 मते मिळाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मोहन राजमाने यांना 6, 300 मते मिळाली. तर आणखी एक अपक्ष उमेदवार गणपतराव तावरे यांना 4, 441 मते घेतली. मात्र, दुस-या फेरीतही दत्तात्रय सावंत यांनी आघाडी घेत साळुंके यांचा धक्कादायक पराभव विजय खेचून आणला.
पुढे वाचा, राज्यातील इतर पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निकाल...