आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा दोन दिवसीय पुणे दौरा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. - Divya Marathi
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
पुणे- ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्यलढ्‌यातच नव्हे तर सामाजिक चळवळी, राजकीय, औद्योगिक, शिक्षण आदी क्षेत्रासह पुरोगामी सुधारणांमध्ये पुणे शहराचे फार मोठे योगदान असून, सर्वच आघाड्यांवर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता पुण्यात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे व्यक्त केले.
पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 'पुण्यभूषण' पुरस्कार 'सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते आज बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात आला. शाल, पुणेरी पगडी, एक लाख रूपये तसेच नांगराच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरात असलेली बाल शिवाजीची प्रतिकृती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई उपस्थित होते.
राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या भाषणात प्रतापराव पवार यांच्या कार्याचा गौरव केला. प्रतापराव पवारांनी यांनी दाखविलेले सामाजिक जबाबदारीचे भान व समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी इतरांसाठी आदर्श घालून देणारी आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
पुढे छायाचित्रातून पाहा, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा दोन दिवसीय पुणे दौरा...
बातम्या आणखी आहेत...