आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणेः सहा महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, चारित्र्याच्या संशयावरुन तलवारीने पत्नीचा गळा चिरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चारित्र्यावर असलेल्या संशयावरुन पतीने पत्नीची तलवारीने गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना काल (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेपूर्वी झालेल्या झटापटीत पतीने पत्नीच्या शरीरावरही तलवारीने वार केले होते. याची माहिती मिळाल्यानंतर लगेच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
पूजा स्वप्निल भडावळे (वय २२, रा. भैरवनाथ मंदिरामागे, गल्ली क्रमांक १४, धायरी) असे हत्या झालेल्या पत्नीचे तर स्वप्निल देविदान भडावळे (वय २३) असे पतीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले, की पुजाचे माहेर पाषाणमधील सुतारवाडीत आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला होता. लग्नानंतर ती घरीच राहायची. तिचा पती स्वप्निल शेती करायचा. काही वर्षांपासून तो बांधकाम व्यवसायात उतरला होता. एका मंगळकार्यालयाचे काम त्याने सुरु केले होते. धायरीत स्वप्निलचे वडिलोपर्जीत घर आहे. येथेच दोघे राहत होते.
पुढील स्लाईडवर वाचा... काय होता दोघांमध्ये वाद.... बायकोचा गळा चिरल्यावर त्याने केला पोलिसांना फोन....
बातम्या आणखी आहेत...