आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का घडविला पुण्यात स्फोट?, कोणती आहेत कारणे व शक्यता...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या चार स्फोटांनी पुणे शहर हादरले. या स्फोटांमध्ये जीवितहानी झालेली नसली, तरी एकाच रस्त्यावर सलग चार स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० ला जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होता. इंडियन मुझाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनेच हा स्फोट घडवून आणला होता. यानंतर पुन्हा एकदा पुण्यात साखळी स्फोट झाले. या स्फोटाची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसली आणि कोणत्याही दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी स्फोटाच्या काही शक्यतांचा विचार करण्यात येत आहे.