आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune International Film Festival To Honour Actors Tanuja, Mahanor

‘पिफ’मध्ये तनुजा, महानोर यांचा गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह कवी-गीतकार ना. धों. महानोर आणि संगीतकार आनंदजी यांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील लक्षणीय योगदानासाठी हा गौरव केला जातो. ‘पिफ’चे उद्घाटन जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. अनेक पुरस्कार मिळवणार्‍या फ्रान्सच्या ‘टिंबकटू’ या चित्रपटाने पिफचे उद्घाटन होणार आहे.

‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १३ वा ‘पिफ’ ते १५ जानेवारीदरम्यान पुण्यात होणार आहे. फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सुमारे ३०० उत्तम चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. १५ हून अधिक विदेशी फिल्म मेकर्सशी संवाद साधण्याचा योगही येणार आहे.

तेंडुलकर स्मृती व्याख्यान : ज्येष्ठचित्रपट कथा, पटकथा, संवादलेखक विजय तेंडुलकर यांच्या स्मृतीनिमित्त होणारे विशेष व्याख्यान यंदा पोलिश दिग्दर्शक ख्रिस्तोफ झानुसी हे गुंफणार आहेत. ‘न्यू नॅरेटिव्ह फॉर्म इन क्रिएटिव्ह वर्ल्ड’ या विषयावर ते विचार मांडतील.