आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : मंगलमय वातावरणात बाप्‍पाला निरोप, मानाच्‍या गणेशाचे हौदात विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आकर्षक रोषणाईने नटलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ. - Divya Marathi
आकर्षक रोषणाईने नटलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ.
पुणे - ढोल ताशाचा निदान. डीजेच्‍या तालावर थिरकणारी पाउले. उधाळला जाणारा गुलाल. रस्‍त्‍याच्‍या कडेने काढलेली सुंदर रांगोळी आणि ओसंडून वाहनारा उत्‍साह. अशा मंगलमय वातावरणात शहरात गणेशाचे विसर्जन झाले. विशेष राज्‍यात दुष्‍काळाचे सावट असल्‍याने यंदा मानाच्‍या पाचही गणेश मंडळांनी नदीघाटाऐवजी बाप्‍पांचे कृत्रिम हौदात विसर्जन केले. शिवाय बहुसंख्‍य नागरिकांनीही आपल्‍या घरातील लाडक्‍या बाप्‍पांना कृत्रिम हौदातच निरोप दिला. यासाठी नदीघाटावर एकूण 174 ठिकाणी व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.
रविवारी सकाळपासूनच भाविकांनी या गणेश मंडळांचे मिरवणूक रथ पाहण्यासाठी शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता हे महत्त्वाचे मार्गावर गर्दी केली होती. त्‍या अनुषंगाने प्रशासनाने चोख व्‍यवस्‍था केली होती.

असे झाले विसर्जन
- तांबडी जोगेश्वरी गणपतीचे 5 वाजून 15 मिनिटांची विसर्जन
- तुळशीबाग गणपतीचे रात्री 7 वाजून 10 मिनिटांची विसर्जन
- संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी गुरूजी तालीम मंडळाचे
' केसरीवाङा गणपतीचे 7 वाजून 42 मिनिटांनी विसर्जन