आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : आयटी पार्कमध्ये तरुणीवर गँगरेप, पार्टीत गुंगीचे औषध देऊन केले दुष्कृत्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शहरातील मध्यवर्ती भागातील हनुमान टेकडीवर प्रतिष्ठित महाविद्यालयातील विद्यार्थीनीवर बलात्काराची घटना ताजी असताना आता आयटी पार्कमधील तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. ऑफिसमधील सहकाऱ्याने ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केल्याचे तरुणीने म्हटले आहे. मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शनिवारी रात्री आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार, ऑफिसमधील सहकाऱ्यांनी पार्टीदरम्यान ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध टाकले, आणि त्यानंतर गँगरेप केला. याप्रकरणी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बलात्काराच्या या घटनेने पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.