आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरजवळ श्रीगोंद्यात झेलम एक्स्प्रेसमधील पुणे, जळगावच्या प्रवाशांना लूटले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यात काष्टी ते लिंपणगाव दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबलेल्या रेल्वेवर दगडफेक करत पुण्यावरुन जम्मू तावी येथे झेलम एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 

दौंड रेल्वे स्थानकावर सायंकाळी 7 च्या सुमारास आलेली झेलम एक्स्प्रेस काष्टी ते लिंपणगाव दरम्यान पावणेआठच्या सुमारास आली. त्यावेळी ही लुट करण्यात आली. साडेसात वाजता झेलम एक्स्प्रेस दौंडवरुन गेली होती, त्यानंतर 15 मिनिटांनी ही लुटीची घटना घडली. लुटारुंनी प्रवाशांचे मोबाईल, घड्याळ आणि सोन्याची चेन लुटली. साधारणपणे एक लाखाचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. पुणे आणि जळगाव जिल्ह्यातील आरबी दास, राणी खान, बाबू खान आणि वैष्णवी हेगडे या प्रवाशांना लुटण्यात आले आहे.

 

सिग्नल नसल्यामुळे झेलम एक्स्प्रेस श्रीगोंदा रेल्वे स्थानकात थांबली होती. त्यावेळी तिघांनी खिडकीतून हात घालून लूट केली. या प्रकरणी रात्री दोन वाजता अहमदनगर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पथक श्रीगोंद्याला रवाना झाले आहे. श्रीगोंदा, दौंड परिसरात वारंवार रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत असतात.

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...