आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साखळी स्फोटानंतरही पुण्याची सुरक्षा वार्‍यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जर्मन बेकरी स्फोटानंतर पुणे शहर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले आहे. त्यापाठोपाठ गतवर्षी 1 ऑगस्ट रोजी शहरातील जंगली महाराज रस्त्यावरही साखळी स्फोट झाले, सुदैवाने यात कोणाचाही बळी गेला नसला तरी पुणेकरांमध्ये दहशत मात्र कायम आहे. या घटनांनंतर राज्य सरकारने शहरात सीसीटीव्ही लावणे व सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन दिले खरे, परंतु वर्षभरानंतरही त्याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे आजही पुण्याची सुरक्षा धोक्यात आहे असेच म्हणावे लागेल.

इंडियन मुजाहिद्दिनचा अतिरेकी कातिल सिद्दिकी याचा येरवडा तुरुंगात कुख्यात गुंड शरद मोहोळ याने सहा जून 2012 रोजी खून केला होता. या हत्येचा बदला घेण्यासाठी गतवर्षी साखळी स्फोट करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी असद खान जमशेदअली (औरंगाबाद), फिरोज ऊर्फ अब्दुल हमीद सय्यद (पुणे), इम्रान खान वाजीद पठाण (नांदेड) व इरफान मुश्ताक लांडगे (अहमदनगर) यांना अटक केली आहे. त्यानंतर ‘एटीएस’च्या पथकाने या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सय्यद जफरुद्दीन बियाबनी (औरंगाबाद), अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार (अहमदनगर), मुनीब इक्बाल मेमन (कोंढवा,पुणे) व फारुक शौकत बागवान (घोरपडी,पुणे) यांनाही अटक करण्यात आली.

‘एटीएस’ने 30 एप्रिल रोजी मुंबई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, फय्याज कागझी, अहमद ऊर्फ वकास, शकीर ऊर्फ असदुल्लाह अख्तर जावेद या अतिरेक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरात हायअलर्ट
साखळी बॉम्बस्फोटाला वर्षे पूर्ण होत असल्याने शहरात हाय अर्लट जाहीर करण्यात आला आहे. धार्मिक स्थळे, कार्यालय याठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून पेट्रोलिंगवर भर देण्यात आला आहे.
गुलाब पौळ, पोलिस आयुक्त, पुणे