आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: कात्रज मार्गावर अपघातात चार ठार, डिव्हायडर तोडून बसने दुचाकींना उडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
पुणे - पुणे-कात्रज महामार्गावरील चांदणी चौकाजवळ रविवरी सकाळी एका खासगी बसने डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूने जात असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दोन दुचाकीवरील तीन जण जागेवरच गतप्राण झाले तर एकाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचाही मृत्यू झाला.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौकात डुक्कर खिंड येथे ही दुर्घटना घडली. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसने डिव्हायडर तोडले आणि दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर बस देखिल उलटली. या अपघातात दुचाकींवरील चार जण ठार झाले. कुबेर विनोद भारती , शंकर बिडकर, सारंग तानाजी काळे अशी मृतांची नावे आहेत. हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्याचे नाव कळू शकलेले नाही.
एका टीव्ही चॅनलच्या वृत्तानूसार, गेल्या तीन-चार वर्षांपासून या महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. रिलायन्स कंपनीकडे महामार्गाचे काम आहे. हे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी अनेक संस्था, संघटनांकडून निवेदने देऊनही कंपनीने कामाची गती वाढवलेली नाही किंवा, प्रशासनाकडून कंपनीविरुद्ध कारवाई केली जात नाही.