आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पुण्यात भरदिवसा बँक मॅनेजरचे अपहरण, पावणेचार लाख रुपये लुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भरदिवसा बँकेत घुसून एका अाराेपीने रिव्हाॅल्वरच्या धाकाने मॅनेजरचे अपहरण करून ३ लाख ८५ हजार रुपये लुटले. ही घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास असलेल्या वाघाेली परिसरात घडली.
अशाेक सहकारी बँकेत बुधवारी दुपारी ग्राहकांची फारशी गर्दी नव्हती. यावेळी हातात रिव्हाॅल्वर घेऊन अालेल्या अज्ञात युवकाने थेट मॅनेजर युवराज राेकडे यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला व शस्त्राचा धाक दाखवत कॅशियरकडील सर्व रक्कम एका पिशवीत टाकण्यास सांगितले. ३ लाख ८५ हजार रुपयांची राेकड असलेली बॅग घेऊन व साेबत मॅनेजरला घेऊन अाराेपी बॅंकेतून बाहेर पडला. रिव्हाॅल्वरचा धाक दाखवत त्याने मॅनेजरला त्याची दुचाकी सुरू करण्यास सांगितले व पाठीमागे बसून यवत परिसरात नेले. मात्र पेट्राेल संपल्याने गाडी बंद पडली. तेव्हा मॅनेजरला तिथेच साेडून अाराेपी एका टेम्पाेतूून पुण्याच्या दिशेने निघून गेला.दरम्यान बँकेत घडलेला सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला अाहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...