आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातून कोकणात धावणार रेल्वे, पर्यटनाला मिळणार चालना- खासदार बारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-कोकण या रेल्वे मार्गाचे ब्रिटिशकालीन सर्वे करण्यात आला होता. त्यानुसारच या प्रकल्पावर काम केले जाणार आहे. - Divya Marathi
पुणे-कोकण या रेल्वे मार्गाचे ब्रिटिशकालीन सर्वे करण्यात आला होता. त्यानुसारच या प्रकल्पावर काम केले जाणार आहे.
पुणे- कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच हिंजवडी व मुळशीतील वाहतूककोंडी दुर करण्यासाठी आगामी काळात मुळशीतून नवी रेल्वेसेवा सुरू करणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. मुळशीत एका कार्यक्रमादरम्यान खासदार बारणे यांनी ही माहिती दिली. पर्यटन व औद्योगिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा हा रेल्वेमार्ग झाल्यास खूप फायदा होणार आहे.
बारणे म्हणाले की, ' आकुर्डी-हिंजवडी-पौड मार्गे कोकणात जाण्यासाठी नवा रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच सुरू करत आहोत. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यासाठी मुळशीतून टाटा कंपनीने 125 वर्षापूर्वी ब्रिटीशकाळी केलेल्या रेल्वेमार्गाची पाहणी व त्या मार्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत पूर्ण झाले आहे. ही रेल्वेसेवा सुरू होताच पुणे, पिंपरी- चिंचवडसह मुळशीतील नागरीकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे मुळशीतील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबर हिंजवडी परिसरात काम करणाऱ्या आयटीयन्सना कोकणात पर्यटनाला जाण्याची संधी या नव्या रेल्वेप्रकल्पामुळे निर्माण होणार आहे. सध्या कोकणात जाण्यासाठी असलेला पौड-कोलाड महामार्गवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामानाने हा महामार्ग लहान असल्यामुळे सातत्याने अपघात होतात. गेल्या 2 वर्षात 72 लोकांना प्राण गमवावे लागले असून 260 पेक्षाही अधिक जखमी झाले आहेत. त्यामुळे हा रेल्वेमार्ग प्रवाशांसाठी सुरक्षित पर्याय होईल.

हिंजवडी आयटी पार्कची समस्या सोडवणार- बारणे
यावेळी हिंजवडीचे माजी सरपंच शामराव हुलावळे यांनी स्थानिक शेतक-यांचे भूसंपादनातील अडचणी, कंपन्यांच्या विविध समस्या, स्थानिकांना रोजगार, व्यावसायिक कर, सीएसआर, पाणी, पर्यायी रस्ते, मेट्रोरेल प्रकल्प, वाढती गुन्हेगारी व वाहतूक प्रश्न सोडविण्याकरिता खासदार बारणे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. यावर बारणे यांनी हिंजवडी वेगाने विकसित होणारे शहर आहे. येथे जागतिक पातळीच्या कंपन्या व कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे येथील भूमीपुत्रासह सर्वांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत कंपन्यांच्या प्रतिनिधींची व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक हिंजवडीमध्ये घेऊ असे बारणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...