आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात लक्ष्मी रोडवरील सराफा दुकानावार दरोडा; अडीच किलो सोने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील विजय मारोती चौकातील पोरवाल ज्वेलर्सवर चार अज्ञातांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडा टाकून सुमारे अडीच किलो सोने, पाच किलो चांदी आणि नगदी दीड लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना घडली. आरोपींनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून ही लूट केली.
विजय मारोती चौकात पोरवाल यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पद्म पोरवाल, राजू पोरवाल आणि एक कर्मचारी दुकानात असताना चार जण दुकानात घुसले. सुरुवातीला त्यांनी तिघांना बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत धमकावले. तसेच या तिघांचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर दुकानातील अडीच किलो सोने, पाच किलो चांदी आणि नगदी दीड लाख रुपये पळवले. घटनेनंतर तिघांपैकी एकाने आपली सुटका करुन घेत जवळच नाकाबंदी करत असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानाने दक्षिण दिशेचा मार्ग दाखवला. मात्र चोरट्यांचा शोध काही लागला नाही. रात्री उशिरा या घटनेचा गुन्हा फरसखाना पोलिस ठाण्यात करण्यात आला.
तनिष्क शोरूमवर फिल्मी स्टाइलने दरोडा, लाखोंच्या दागिन्यांची लूट