आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील टिळक पथावर लॅपटॉपच्या दुकानाला भीषण आग, लाखोंचा माल जळून कोळसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील टिळक रोडवर एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला सोमवारी दुपारी 12 वाजता अचानक आग लागली. इंदिरा चेंबर्समधील वर्ल्ड ऑफ लॅपटॉप्स या दुकानाला ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असा प्राथमिक निष्कर्श काढण्यात आला आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी 20 मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली तरीही अवघ्या काही मिनिटांत लाखोंच्या लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक्सचा कोळसा झाला. सुदैवाने या अपघातात कुठल्याही जीवित हानीचे वृत्त नाही. 
बातम्या आणखी आहेत...