आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Loksabha Election, FIR Againest Kadam & Paigude

PHOTOS: मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; कदम, पायगुडेंवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांचे कार्यकर्ते आणि कदम यांच्या भारती विद्यापीठातील तीन कर्मचारी मतदारांना रास्ता पेठेत पैसे वाटप करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पकडले. या तीन कार्यकर्त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच मनसे स्टाईलने चोप दिला. त्यांच्याकडून कदम यांच्या प्रचाराचे साहित्य आणि 16 हजारांची रोकड ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, या तिघांना अटक करावी यासाठी मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी रात्रभर समर्थ पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले. विश्वजित कदम यांच्यासह या तीघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यानंतर काँग्रेसनेही मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. अखेर पोलिसांनी एकमेंकाविरूद्ध परस्परविरोधी तक्रार दिल्याने कदम आणि पायगुडे यांच्यावरही गुन्हा दाखल केले आहेत. दोघांवरही पैसे व वस्तू चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
डॉ. सुरेंद्र मार्तंड वेदपाठक, अमोल मुळे आणि उदय पाटकर अशी या तिघांची नावे आहेत. वेदपाठक हे भारती विद्यापीठाच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य आहेत. इतर दोघे भारतीमध्ये कर्मचारी आहेत. याचबरोबर आणखी आठ-दहा पैसे वाटणारे लोक पळून गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत मनसेच्या वतीने सांगण्यात आले की, रास्ता पेठेतील पूना कॅफेजवळ कदम यांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. त्यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी तिघेजण पैसे वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तत्काळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी या तिघांना पकडले व त्यांच्याकडील रोख रक्कम, प्रचार साहित्य ताब्यात घेतले. या तिघांना मनसेच्या रास्ता पेठेतील कार्यालयात नेले व चांगलाच चोफ दिला. त्यांच्या अंगावर कपडेही ठेवले नाहीत. याची माहिती मिळताच त्याच भागात कदम यांचे आठ-दहा कार्यकर्ते पैसे वाटप करीत होते. त्यांच्याकडे 10-12 लाख रूपये होते अशी मनसेने तक्रार दिली आहे.
यानंतर दीपक पायगुडे यांनी पोलिस अधिका-यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. पायगुडे यांनी सांगितले की, पुणे शहराची एक वेगळी ओळख या देशात, राज्यात आहे. पैशांच्या जोरावर कदम पुण्याची संस्कृती बिघडवत आहे. पुणेकर तर अशा लोकांना कात्रजचा घाट दाखवतीलच पण त्याआधी कदम यांना अटक झाली पाहिजे अशी भूमिका घेत पायगुडे यांनी रात्रभर पोलिस ठाण्यासमोर तळ ठोकला. दरम्यान, कदम यांनी पैसे वाटप करीत नसल्याचे म्हटले आहे. भारती विद्यापीठातील कर्मचारी हे खासगी कामासाठी पुण्यात आले होते. ते पैसे वाटप करीत असल्याची माहिती खोटी आहे.

पुढेे वाचा, या घटनेतील क्षणचित्रे...