आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Malin Landslide Mother Baby Saved News In Marathi

माळीण दुर्घटना: 3 महिन्यांचा मुलगा, जमिनीखाली रडला आणि वाचले 4 जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माळीण गावावर सध्या संकटांचा पर्वत कोसळला आहे. आतापर्यंत 70 मृतदेह चिखल-मातीच्या ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. प्रत्येक घरी कुणाचा न् कुणाचा मृत्यू झाला आहे. काही कुटुंबांमध्ये तर कुणीही शिल्लक राहिले नाही. पण रुद्र नावाच्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याच्या घरी सगळे काही आलबेल आहे. त्याची आई, आजोबा आणि आजी सगळे ठिक आहेत. केवळ तीन महिन्यांचा रुद्रने तिघांचा प्राण वाचवला. तेही केवळ रडून.
बुधवारी सकाळच्या सुमारास माळीण गावावर पर्वतकडा कोसळला. यावेळी रुद्रला त्याची आई दुध पाजत होती. त्याचे आजी-आजोबा जवळच्या खोलीत झोपले होते. काही समजायच्या आत माती आणि चिखल घराच्या छातावर असलेल्या टिनांवर येऊन कोसळला. छत हळूहळू खाली येऊ लागले. या टिनांच्या खाली रुद्र आणि त्याची आई अडकून पडले होते. त्यांचे संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले असल्याने त्यांना बाहेर येता येईना. जसाजसा वेळ जात होता तस तशी श्वास घेण्यासाठी हवाही कमी पडत होती. सहा-सात तास झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची शुद्ध हरपली. यादरम्यान, बचाव दलाचे जवान घटनास्थळी आले होते. माती काढली जात होती. दुसरा दिवस उजाडला होता.
यावेळी रुद्र आणि त्याच्या आईला पुन्हा शुद्ध आली. त्यांना बचाव दलाच्या जवानांचा आवाज येत होता. पण आईचा आवाज काही जवानांपर्यंत जात नव्हता. अखेर आईने रुद्रला रडवले. रुद्रचा आवाज ऐकून बचाव दलाचे जवान आपल्याला वाचवतील, असे त्या माऊलीला वाटले होते. अखेर तिचा हेतू साध्य झाला. बचाव दलाच्या जवानांना रुद्रचा आवाज आला. त्यानंतर संपूर्ण टीम कामाला लागली. त्यांनी रुद्र, त्याची आई आणि आजी-आजोबांना सुखरुप बाहेर काढले.
पुढील स्लाईडवर बघा, रुद्र आणि त्याच्या आईची भावनिक छायाचित्रे....