आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवार यांच्या आदेशाने पुण्याच्या महापौरांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पुण्याच्या महापौर वैशाली बनकर यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सव्वा वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्याने बनकर यांच्या राजीनाम्याची मागणी गेले काही दिवस सुरू होती. सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बनकर यांना राजीनामा देण्याचे आदेश फॅक्सद्वारे दिले. पुण्याचे महापौरपद महिला ओबीसीसाठी राखीव असल्याने आता संगीता कुदळे, चंचला कोद्रे, उषा कळमकर आणि नंदा लोणकर यांच्या नावांची चर्चा आहे.