आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्‍यातील मेट्रोच्‍या वनाझ ते रामवाडी टप्‍प्‍याला मान्‍यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पुणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पुण्यातील वनाझ ते रामवाडी या मेट्रो प्रकल्पाच्या उन्नत मार्गाच्या टप्प्याला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात संपुष्टात येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर नागपूरमधील सीतबर्डी, विमानतळ ते बुटीबोरी या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाच्या उन्नत मार्गाला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यातील मेट्रो प्रकल्पाच्या 75 किलोमीटरपैकी पहिला टप्पा हा सुमारे 31 किलोमीटरचा असून तो स्वारगेट ते पिंपरी चिंचवड दरम्यान असणार आहे. या प्रकल्पासाठी 5 हजार 391 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. तर दुसरा टप्पा कोथरूड ते रामवाडी असा असून या टप्प्याला 2 हजार 593 कोटी रूपये लागणार आहेत. या मार्गा वर 15 स्थानके आणि एक डेपो असणार आहे. डेपोसाठी 18 हेक्टर जागा लागणार आहे. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत सेवेत येणार असून त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी बांधकामासाठी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रकल्प उभारणीसाठी 10 टक्के रक्कम पुणे महापालिका, 20 टक्के रक्कम केंद्र सरकार तर 50 टक्के रक्कम कर्ज अथवा बांधा वापरा हस्तांतरीत करा या धर्तीवर गोळा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या कामासाठी पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात येणार असून तोपर्यंत पुणे महापालिका प्रभारी म्हणून काम पाहील, असेही यावेळी ठरवण्यात आले.
मुख्‍यमंत्री म्‍हणतात एलिव्‍हेटेड मेट्रो, अजितदादांना हवी भूमिगत
पुण्यात मेट्रो येणारच, कॉँग्रेसच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही