आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार जलील यांनी पैसे घेतले; पुणे एमअायएम शहराध्यक्षांचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे तिकीट वाटप करताना मनमानी करण्यात आली तसेच औरंगाबाद येथील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पाच ते दहा लाख रुपये घेतल्याचा आरोप पुणे एमआयएमचे शहराध्यक्ष झुबेर शेख यांनी बुधवारी केला.  
 
शेख म्हणाले, पुणे मनपा निवडणुकीत एमअायएमचे तिकीट वाटप करताना पुणे शहराध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आले.  तसेच काही ठिकाणी उमेदवारांकडून पैसे घेण्यात आले. त्यामुळे पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे या पराभवाची संपूर्ण जबाबदारी अा. जलील यांच्यावर अाहे. प्रभाग क्र.१८ मधील शाहिद शेख, प्रभाग क्र.२७ मधील अहमद खान यांच्याकडे जलील यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये मागितले, तर प्रभाग क्र.१७ मधील फरिद रशीद खान यांच्याकडून उमेदवारासाठी पाच लाख रुपये घेण्यात अाले. प्रभाग क्र.१९ मध्ये एमअायएमचा शहराध्यक्ष पाडण्यासाठी एमअायएमच्या अामदारांनी काँग्रेसकडून सुपारी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.   
 
अाैरंगाबादच्या नगरसेवकांनीही पैसे घेतले: झुबेरबाबू शेख म्हणाले, पुणे मनपा निवडणुकीदरम्यान जलील यांच्यासोबत औरंगाबादहून एमआयएमचे सहा नगरसेवक आले होते. त्यांनी भाजपच्या उमेदवारांकडून पैसे गाेळा केले. तिकीट वाटपासाठी काेणालाच विश्वासात घेतले नाही. पुण्यातील एमअायएमच्या सर्व सभांचा खर्च अाम्ही केला. अा. जलील यांनी काेणताही खर्च न करता पैसे उकळले, असा शेख यांचा अाराेप अाहे.

काहीच बाेलणार नाही : जलील  
याप्रकरणी आमदार जलील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत आपण काहीही बोलणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षाचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी घेतील.  
बातम्या आणखी आहेत...