आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune mumbai Express Way Acident, 4 Dead, 12 Injured

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 4 ठार, 12 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. यातील बहुतेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमींवर नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईजवळील खालापूर परिसरातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेंभरी गावाजवळ एका उभ्या टेम्पोला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यात टेम्पोला जोरदार धडक बसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. जखमींना नवी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात उपाचारासाठी दाखल केले आहे. मृतांची व जखमींची नावे कळू शकलेली नाहीत.