आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार अपघातात चार जण जागीच ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगावजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाले. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे भरधाव जाणार्‍या कारवरील (एमएच 12 जेझेड 9782) चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्ता दुभाजक तोडून कार विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून उंच उडाली. कार खाली पडल्याने तिचा चुराडा झाला. कारमधील सहा प्रवाशांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी आहेत. चंद्रशेखर दुरसकर, अशोक बाळकृष्ण, नागराज राव व अरुण नायर अशी मृतांची नावे आहेत.

छायाचित्र - संग्रहित