आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मुंबईत पर्यटकांसाठी ‘एमटीडीसी’ची पाण्यावर चालणारी बस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी काही नविडक शहरात पाण्यावर धावणारी बससेवा सुरू करण्याची योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आखत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे व मुंबई येथे ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे.
याबाबत एमटीडीसीचे सहायक व्यवस्थापक सतीश सोनी म्हणाले, महामंडळाच्या व्यवस्थापक वलसा नायर यांनी हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार सुरुवातीला मुंबई पोर्ट येथे ही सेवा सुरू करण्याचा विचार आहे. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. सध्या लंडनच्या नदीवर ही सेवा सुरू आहे. आम्ही तेथील बस सेवेबाबत माहिती जाणून घेत आहोत. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकल्पाची सुरुवात करण्यात येईल. तज्ज्ञ समिती ही राज्यातील नद्या व तेथील कनिारा असलेल्या स्थळाची पाहणी करेल. तसेच तिथे पर्यटनाला किती चालना आहे, हेही पाहण्यात येईल. त्यानंतर योग्य ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येईल, असेही सोनी म्हणाले.
समुद्र किनाऱ्यांवर बसचा थांबा
ही सेवा सुरुवातीला मुंबईतील अरबी सुमद्रात सुरू करण्यात येईल. त्यानुसार समुद्राच्या नविडक कनिाऱ्यावर बसचा थांबा असेल. जिथे पर्यटकांना तेथील माहिती देण्यात येईल.
गडकरींचाही पुढाकार
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीही पाण्यावर चालणाऱ्या बससाठी पुढाकार घेतला आहे. दोन दविसांपूर्वी नागपुरात पत्रकारांशी बाेलताना त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. ‘आता देशात पाण्यावर उतरणारे विमान सुरू झाले आहे. पण विदेशात पाण्यावर चालणारी वाहनेही आली आहेत. अशा काही वाहनांचे सादरीकरण आपण पाहिले असून महाराष्ट्रातही अशी वाहने आणण्याचा आपला प्रयत्न आहे. ही सुविधा सुरू झाल्यास मुंबई ते गोवा तसेच कोकणात याचा फायदा होईल. यामुळे भूपृष्ठ वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल,’ असे गडकरींनी सांगितले होते.