आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.सिद्धार्थ धेंडे पुण्याचे नवे उपमहापौर; एेनवेळी काँग्रेसच्या माघारीने बिनविरोध निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महापालिकेच्या उपमहापौरपदी रिपाइंचे (आठवले गट) डॉ.सिद्धार्थ धेंडे यांची आज (बुधवारी) बिनविरोध निवड झाली. उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे उपमहापौरपद रिक्त झाले होते.

महापालिकेच्या सभागृहात सकाळी उपमहापौरपदाची निवडणूक झाली. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवार नगरसेविका लता राजगुरु यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने डॉ. धेंडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

डॉ. धेंडे येरवडा परिसरातून सलग तिसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत. मागील दोन टर्म त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी गटनेता, स्थायी समिति आणि शहर सुधारणा समितिमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये ते भाजपसोबत आघाडीमध्ये कमळ या चिन्हावर विजयी झाले आहेत. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविल्याने रिपाइंचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र गट आणि गटनेत्याचे स्वप्न अपूर्णच राहिले होते. दरम्यान, उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या आकस्मिक निधनामुळे पक्षाच्या वतीने डॉ. धेंडे यांना संधी देण्यात आली.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...