आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Municipal Corporation Opposition Leader Arvind Shinde

पुणे मनपात अजब राजकीय समीकरण ; सत्तेत आणि विरोधी पक्षनेतेपदीही काँग्रेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांची निवड झाली आहे. याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे हे पद होते. त्यांचे संख्याबळ एकने कमी झाल्याने काँग्रेसला नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

पुणे मनपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे. आता विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस उमेदवाराची निवड झाल्याने काँग्रेस सत्तेत आणि विरोधीपक्षातही अशा दुहेरी भूमिकेत असणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपातील संख्याबळ २९ असल्याने त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद होते. मनसेच्या कल्पना बहिरट यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यामुळे मनसेचे संख्याबळ एकने कमी होऊन २८ वर आले आहे. काँग्रेसचेही २८ नगरसेवक आहेत. मात्र, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आल्याचे महापौर वैशाली बनकर यांनी सांगितले आहे.

मनपा वर्तूळात अशी ही चर्चा आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महापौर बनकर यांना पत्र लिहून विरोधी पक्षनेते पदी काँग्रेस नगरसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मनपातील क्रमांक दोनच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात येत असल्याचे ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितले आहे.