आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे महापालिकेतील 52 अभियंत्यांची तडका फडकी बदली, आयुक्तांनी सूड उगावल्याची भावना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महापालिकेतील 52 वरिष्ठ अभियंत्यांची काल रात्री तडका फडकी बदली करण्यात आली आहे. विषेशतः बांधकाम आणि पाणी पुरवठा विभागामधे अंतर्गत बदल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या बदल्या करताना पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांच्याकडील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचा पदभार काढून घेत या योजनेसाठी आयुक्तांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सेल स्थापन केला आहे. परंतु या बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमधे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून  सर्व विभाग प्रमुखानी आज स्थायी समिति बैठकीवर अघोषित बहिष्कार घातला आहे.
 
      
महापालिका आयुक्त कुणाल कुमार सोमवारी रात्री यांनी हे बदलीचे आदेश काढले. परंतु प्रथमच दुसऱ्या दिवशी ते संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याने पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. बदली झालेल्यांमधे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध पावसकर, श्रीकांत वायदंडे , पथ विभागाचे युवराज देशमुख यांचा समावेश आहे.
 
       
बदल्यांचे आदेश आज सकाळी हाती पडल्यानंतर अधिकाऱ्यांमधे तिव्र असंतोष पसरला. अशातच दुपारी 2 वाजेपर्यंत नविन नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहावे लागणार असल्याने रिलीव लेटरसाठी अधिकारी विभागप्रमुखांच्या कर्यालयात जमले होते. त्यामुळे विभाग प्रमुखही स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीकडे फिरकले नाहीत. 
 
    
महापालिकेच्या वतिने 24 तास पाणी पुरवठा योजना राबविन्यासाठी 2,264 कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव नुकतेच महापालिकेत मंजूर झाला. पाईप लाइनच्या कामाची निविदा आल्याने त्यासोबत करण्यात येणाऱ्या केबल डक्टच्या कामाचे एस्टीमेट करणे नियमबाह्य ठरेल असे स्पष्ट करत एस्टीमेट कमिटिने त्याला विरोध केला होता. त्यामुळेच आयुक्तानी सुड उगवत या बदल्या केल्या असा आरोप अधिकारी करू लागले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...