आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिहेरी हत्याकांड; सावकार अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कर्जबाजारीपणामुळे आई, पत्नी व मुलीचा गळा दाबून त्यांना ठार करणार्‍या पुण्यातील सागर गायकवाड याने एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी खासगी सावकार रवी पवार याला गुरुवारी अटक केली असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. सागरने पवारकडून 15 टक्के व्याजाने 1 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम परत न केल्याने पवारने गायकवाडची होंडा कार जबरदस्तीने पळवली होती. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कर्जबाजारीपणाच्या तणावातून गायकवाडने आई, पत्नी व मुलीची गळा दाबून हत्या केली होती.