आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनडीए गैरव्यवहार प्रकरण : आरोपींच्या चौकशीची सीबीआयला परवानगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) कर्मचारी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणा-या आरोपींकडून लाचेच्या रकमेपैकी 74.5 लाख रुपये हस्तगत झालेले नाहीत. ही रक्कम हस्तगत करण्यासाठी आरोपींची अधिक चौकशी करण्याची गरज असल्याचा अर्ज सीबीआयने न्यायालयात सादर केला होता. विशेष सत्र न्यायाधीश डी.आर. महाजन यांच्या न्यायालयाने शुक्रवारी त्याला मान्यता देऊन सीबीआयला चौकशीची परवानगी दिली आहे.
सीबीआयचे वकील अयुब पठाण म्हणाले, सीबीआयला आरोपींकडे अधिक चौकशी करण्यासाठी अधिक कागदपत्रांची गरज आहे. अर्जानुसार सीबीआय चार ते अकरा आॅगस्टदरम्यान आरोपींकडे न्यायालयीन कोठडीत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान चौकशी करणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक राजपाल सिंग यांना आरोपींच्या चौकशीस परवानगी दिली आहे.