आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune New Goldman Datta Fudge In Genis Book Of World Rectord

गोल्डमॅन दत्ता फुगेची नोंद गिनीज बुकमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तीन किलो वजनाच्या सोन्याच्या शर्टमुळे चर्चेत आलेले गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या अनोख्या शर्टची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. जगात सर्वात महाग शर्ट खरेदीचा विक्रम फुगे यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र त्यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आले.
पुण्यातील रांका ज्वेलर्सने बनवलेल्या या शर्टसाठी एक लाख खडे आणि सोळा हजार टिकल्या वापरण्यात आल्या आहेत. शर्टसाठी 24 कॅरेट सोन्याचाच वापर करण्यात आला आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत 66 लाख 15 हजार 481 रुपये आहे. फुगे यांनी 27 डिसेंबर 2012 रोजी हा शर्ट खरेदी केला. 6 फेब्रुवारी 2013 रोजी या शर्टची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. फुगे म्हणाले, ‘गोल्डमॅन होण्याची माझी इच्छा पूर्ण झाली आहे. या शर्टसोबत अडीचशे ग्रॅम वजनाचा सोन्याचा बेल्टही तयार केला होता. मात्र, त्याची नोंद झालेली नाही.’
नसून शर्टची नोंद करण्यात आली आहे.

सोन्याच्या शर्टची किंमत 66 लाख 15 हजार 481 रुपये
पंधरा बंगाली कामगारांनी तयार केला
दोन आठवड्यांत रोज 16 ते 18 तास कारागीर राबले
सोळा हजार टिकल्यांचा वापर
एक लाख छोटे खडे जडवले