आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातून नक्षलवादी प्रशिक्षणासाठी गेलेला बेपत्ता तरुण एटीएसच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नक्षलवादी कारवायांत सहभागी असलेला अरुण भेलके व त्याची पत्नी कांचन ननावरे यांनी पुण्यातील कासेवाडी येथून २०१० मध्ये एका तरुणास गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवादी प्रशिक्षणास पाठवले होते. दहशतवादविरोधी पथकास (एटीएस) चौकशीदरम्यान हा तरुण सापडला आहे.
भेलकेने गडचिरोलीतील जंगलात त्याच्याशी संपर्क साधल्याची माहिती एटीएसने सोमवारी सत्र न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने २६ सप्टेंबरपर्यंत भेलके दांपत्याच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे. सापडलेल्या तरुणाने पोलिसांना जंगलातील नक्षलवादी प्रशिक्षणाची जागा दाखवू असे सांगितले आहे. पोलिसांना त्या दृष्टीने त्याच्याकडे तपास करायचा आहे, असे सरकारी वकील विकास शहा यांनी न्यायालयात सांगितले.