आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune News In Marathi, Traffic Police , Divya Marathi

पुण्यात 11 वाहतूक पोलिस निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी पुणे वाहतूक शाखेतील 11 पोलिसांना शुक्रवारी निलंबित केले. हे कर्मचारी ड्यूटीच्या ठिकाणी हजर न राहता एकत्रितरीत्या गप्पा मारत असल्याचे उघडकीस आले.


या कर्मचा-यांवर यापूर्वीही शिस्तभंगाची कारवाई करून तोंडी ताकीद देण्यात आली होती. जादा कवायत, सक्त ताकीद तसेच दंडात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता. कर्तव्याचे ठिकाण न सोडण्याबाबत वारंवार लेखी तसेच तोंडी सांगूनही शुक्रवारी सदर कर्मचारी कर्तव्याचे ठिकाणी गैरहजर आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संतोष अंदुरे (नेमणूक - बंडगार्डन विभाग), मनीषा जाधव (बंडगार्डन), व्ही.जे. साबळे (हिंजवडी), डी. व्ही. झांजरे (हिंजवडी), पी. व्ही. आल्हाट (चतु:शृंगी), डी. एस. गेंगजे (चतु:शृंगी), सचिन भिंगारदिवे (कोरेगाव पार्क), रमेश गायकवाड (कोरेगाव पार्क), नीलम जाधव (बंडगार्डन), प्रकाश मरगजे (भारती विद्यापीठ), शहाजी लोखंडे (स्वारगेट) अशी त्या कर्मचा-यांची नावे आहेत.