आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात विद्युत रोषणाईने भरले विसर्जन मिरवणुकीत रंग, फेडले डोळ्यांचे पारणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानाच्‍या पाचही गणपतींचे विसर्जन झाल्‍यानंतर सायंकाळी मिरवणूक भरात आली आहे. डीजेच्‍या तालावर तरुणाई बेंधुंद होत नृत्‍य करत आहे. विद्युत रोषणाईने मिरवणूकीत वेगळाच रंग भरला आहे. काही तरुणांनी डीजेच्‍या तालावर लुंगी डांस केला. सार्वजनिक एकापाठोपाठ एक सार्वजनिक गणेश लक्ष्‍मी रस्‍त्‍यांवरुन अलका टॉकीज चौकात पोहोचत आहेत. विविध देखावे आणि आकर्षक रोषणाईने भाविकांच्‍या डोळ्यांचे पारणे फेडले. दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने यावर्षी शेषात्मज गणेशरथ तयार केला आहे. त्यावर सुमारे दोनशे नागांच्या प्रतिकृती आणि श्रींच्या मस्तकावर शेषनागाचा फणा, असा हजारो विद्युतदीपांनी उजळलेला देखावा आहे.

नरवीर तानाजी आखाडा तरुण मंडळ ट्रस्टतर्फे 'गड आला पण सिंह गेला' हा जिवंत देखावा सादर करण्‍यात आला.


विद्युत रोषणाईत न्‍हाऊन निघालेले बाप्‍पा आणि मिरवणुकीत जल्‍लोषात नृत्‍य करणा-या तरुणाईची छायाचित्र पाहण्‍यासाठी क्ल्कि करा पुढील स्‍लाईड्सवर...