आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींच्‍या पालखीचे हवाई चित्रीकरण करताय? सावधान, जेलमध्‍ये जाल !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे – महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत पंढरपूरकडे पालख्‍या रवाना होत आहेत. वारक-यांच्‍या भक्‍तीला उधाण आले आहे. पण, यंदा ज्ञानेश्‍वर माउलींच्‍या पालखीचे ड्रोन कॅमे-याने चित्रीकरण करण्‍याचे ठरवले असेल तर सावध व्‍हा ! सुरक्षेच्‍या दृष्‍टीने पुणे जिल्‍हा प्रशासनाने याला बंदी घातली आहे. जर कुणी असे चित्रीकरण करत असेल तर त्‍याच्‍यावर कायदेशीर कारवाईही होणार आहे.
आषाढी एकादशी जवळ आली आहे. वारक-यांना पंढरीची ओढ लागली आहे. पण, ड्रोन उपकरणाद्वारे दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी खबरदारी म्‍हणून ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्‍यावर पुणे जिल्‍हाधिका-यांनी बंदी घातली आहे.