आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना-बिपाशा बसूसह अनेक कलाकारांची पुण्यात दहीहंडीला हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वाकड कस्पटे वस्ती येथील साईराज प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात कंगना राणावत, दिया मिर्झा व प्रिया बापट यांना निमंत्रित करण्यात आले आहे.)
पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र जोरदार तयारी असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदा राजकीय नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन करीत शक्तीप्रदर्शन करण्याचा चंग केला आहे. त्याचमुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज बॉलिवूड व मराठी सिनेतारंकाची मांदियाळीच उपस्थित राहणार आहे.
आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत, बिपाशा बसू, परिणिती चोप्रा, जॅकलिन फर्नांडिस, दिया मिर्झा, प्राची देसाई, डेझी शाह, मुग्धा गोडसे, कायनात अरोरा, दिव्यांका त्रिपाठी, प्रिया बापट, नेहा पेंडसे, प्राजक्ता माळी, उर्मिला कानिटकर, कासवी कांचन, संजना गणेशन, राजेश्वरी खरात, तेजश्री प्रधान, प्रतिक्षा जाधव, नफिसा या प्रमुख सिनेतारकांसह बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्ठीतील कलाकार आज पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात हजेरी लावणार आहेत.
यंदाचे वर्षे निवडणुकीचे असल्याने पाच लाखांपासून ते 21 लाखांपर्यंत दहीहंडी फोडण्यासाठी प्रथम क्रमाकांचे बक्षिस ठेवली आहेत. याचबरोबर आपआपल्या परिसरात नागिरकांना आकर्षित करण्यासाठी तेथे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. शहर व परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. याचबरोबर मंडप उभारले गेले आहेत. एकीकडे नागरिकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी केली असली तरी दुसरीकडे पोलिसांनी आपली तयारी केली आहे.
पोलिसांनी स्पीकर व डीजेसाठी दहा वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. त्यासाठी पोलिस व काही जानकर मंडळींनी हा उत्सव वेळेत संपवावा यासाठी आयोजकांची भेट घेत आहेत. याचबरोबर सुप्रीम कोर्टाने आखून दिलेल्या गाईडलाईन्सनुसार उत्सव पार पाडण्याचे पोलिस आवाहन करीत आहेत. याचबरोबर आयोजकांनी कायदा हातात घेतला तर काय करायचे याचे पोलिसांनी नियोजन केले आहे. बालगोविंदाचा पथकात समावेश आहे किंवा नाही तसेच 20 फुटापर्यंतचे थर लावणार असतील तर सुरक्षा उपाययोजना केली आहे की नाही याची चाचपणी पोलिस दहीहंडी आयोजकांकडे करीत आहेत.
पुढे वाचा कोणती अभिनेत्री कोठे राहणार आहे उपस्थित...