आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे, पिंपरी-चिंचवड: BJPची ‘NCP’ ला धोबीपछाड, NCP च्या बालेकिल्ल्यात \'कमळ\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री गिरीष बापट यांना पेढा भरवून भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना भाजपचे राज्यसभा सदस्य संजय काकडे. - Divya Marathi
पालकमंत्री गिरीष बापट यांना पेढा भरवून भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना भाजपचे राज्यसभा सदस्य संजय काकडे.
पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका पहिल्यांदाच जिंकत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत या दोन्ही शहरांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कधी स्वतंत्रपणे तर कधी एकत्रितपणे यांची सत्ता होती. मात्र, या दोन्ही पक्षांना दोन्ही शहरात नगण्य यश मिळाले. शिवसेनेच्या वाट्यालाही दोन्ही शहरात मर्यादीत यश आले. ‘मनसे’ला पिंपरी-चिंचवडमध्ये भोपळाही फोडता आला नाही. पुण्यात जेमतेम खाते खोलता आले.
 
१६२ सदस्यसंख्या असलेल्या पुण्यात बहुमतासाठी ८२ जागांची आवश्यकता आहे. हा आकडा भाजपने सहज ओलांडला. पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२८ सदस्यसंख्या आहे. या शहरात बहुमतासाठी आवश्यक असलेला ६४ चा जादुई आकडा भाजपने स्वबळावर गाठला. दोन्ही शहरात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त पीछेहाट झाली. 
 
पिंपरी-चिंचवडमध्ये ८४ जागा असलेली राष्ट्रवादीच्या अनेक मातब्बरांचा पराभव झाला. विद्यमान महापौर शकुंतला धराडे, सहावेळा नगरसेवक राहिलेले माजी महापौर आर. एस. कुमार यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांचा यात समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या आमदार लक्ष्मण जगताप, आझम पानसरे आणि अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या एकत्रित नेतृत्त्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तापालट करण्यात भाजपला यश आले. पुण्याच्या सर्व भागात भाजपला इतर पक्षातून घेतलेल्या कार्यकर्त्यांचा चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. 
 
यामुळे उपनगरांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. भाजपचा पारंपरिक मतदार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सततच्या सत्तेला नाकारणारा मतदार आणि नवमतदार यांनी भाजपला साथ दिल्याचे निकालानंतर दिसून आले. ज्या ठिकाणी भाजपला आजवर उमेदवार मिळत नव्हता अशा ठिकाणीही कमळ फुलले. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचे गारुड शहरवासीयांवर असल्याचे स्पष्ट झाले.

‘शतप्रतिशत’ भाजप : २०१४ मध्ये पुण्यातील विधानसभेच्या आठही आणि लोकसभेची एक जागा भाजपने जिंकली होती. त्यानंतर अडीच वर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीतही स्पष्ट बहुमत मिळवत पुणेकरांचा विश्वास कायम असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. यामुळे ‘पालिका ते पार्लमेंट’ एकच सरकार स्थापन करण्याची भाजपची इच्छा पुणेकरांनी पूर्ण केली. २०१२ मध्ये पुण्यात भाजपचे फक्त २६ नगरसेवक होते. यंदा यात तिपटीपेक्षा जास्त वाढ झाली. गुंडांना उमेदवारी, संभाजी ब्रिगेडच्या माजी पदाधिकाऱ्यांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांची फसलेली सभा या पार्श्वभूमीवर भाजपच्या यशाबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, पुणेकरांनी भाजपकडे सत्ता दिली आहे.
 
जिल्हा परिषद राष्ट्रवादीने राखली : दोन्ही महापालिका गमावण्याची नामुष्की आलेल्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत मात्र एकहाती सत्ता राखली. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे ४४ सदस्य निवडून आले. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शिवसेनेला १३ तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी ७ जागा जिंकता आल्या. राष्ट्रीय समाज पक्षानेही एक जागा जिंकत खाते उघडले. अजित पवार यांचे पुतणे रोहित, हर्षवर्धन पाटील यांच्या ७५ वर्षांच्या आई रत्नप्रभा, दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक, मंत्री विजय शिवतारे यांचे मेहुणे दिलीप यादव यांचा प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे. भाजप आमदार बाबुराव पाचर्णे यांचा मुलगा राहुल व राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांना पराभव स्वीकारावा लागला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांचा राजीनामा
-पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांचा राजीनामा.
-काँग्रेसची आजवरच्या इतिहासातील नीचांकी कामगिरी.
-महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, चंचला कोद्रे, (सर्व राष्ट्रवादी) माजी उपमहापौर आबा बागूल (काँग्रेस), स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे (राष्ट्रवादी) या विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा एकदा विजयी.
-सन २०१२ मध्ये २९ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी फक्त दोन जागा.
-मावळत्या महापालिकेतील गटनेते सुभाष जगताप (राष्ट्रवादी), बाबु वागसकर (मनसे), अशोक हरणावळ (शिवसेना) गणेश बीडकर (भाजप) या सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पराभव.
-पुण्याचे उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी महापौर कमल व्यवहारे (सर्व काँग्रेस)राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी उपमहापौर राजलक्ष्मी भोसले (सर्व राष्ट्रवादी) यांचाही पराभव.
-शिवसेना शहराध्यक्ष विनायक निम्हण यांचे पुत्र व विद्यमान नगरसेवक सनी निम्हण यांचा पराभव तर काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे पुत्र अविशान बागवे आणि खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय.

मुख्यमंत्र्यांची सभा फ्लाॅप झाली तिथेही फुलले कमळ
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातल्या सदाशिव पेठेत फ्लाॅप झालेल्या सभेची प्रचंड चर्चा झाली होती. पुणे महापालिका निवडणुकीची प्रचारसभा केवळ श्रोत्यांच्या रिकाम्या खुर्च्यांमुळे रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर अाेढावली हाेती. मात्र या सभास्थानाच्या आसपासच्या सर्व जागा भाजपने प्रचंड मताधिक्याने जिंकल्या आहेत.  
 
सदाशिव पेठ- नारायण पेठ हा पुण्याचा मध्यवर्ती भाग भाजपचा पारंपरिक मतदार असलेला आहे. याच भागातल्या टिळक रस्त्यावरील इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होती. मतदारांनी या सभेकडे पाठ फिरवली हाेती. शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय विराेधकांनीही या सभेचा संदर्भ देऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली. असे असली तरी प्रभाग १५ मध्ये येणाऱ्या या भागातल्या भाजप उमेदवारांना मात्र भरघाेस मते दिली.
 
शहरातून सर्वोच्च मताधिक्याचे उमेदवार याच प्रभागातून निवडून आले. तेही भाजपच्या चिन्हावर. सभा रद्द झाली तरी आम्ही जनतेच्या मनात असल्याचे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून दिले होते. एवढेच नव्हे तर या भागात मतदानही सुमारे ६२.५१ एवढे सर्वाधिक झाले आहे. 
 
विजयी उमेदवारांना मिळालेली मते 
- ४३,८०५  हेमंत रासणे
- ४३,८०२  राजेश येनपुरे
- ४३,८०२  मुक्ता टिळक
- ४३,७७९  अॅड. खडके
 
उट्टे काढले : शनिवार पेठ या प्रभागातल्या ७० हजार ३ मतदारांनी मतदान केले. प्रभागातून विजयी झालेल्या भाजपच्या चार उमेदवारांना जवळपास सारखीच मते मिळाली. त्यामुळे राज्यभर हसे झालेल्या सभेचे उट्टे येथील भाजपच्या पारंपरिक मतदारांनी मतदानाद्वारे काढल्याचे दिसत आहे. 
 
टिळकांच्या नावाची महापाैरपदी चर्चा  
पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांचे नाव महापौरपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. २८ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवलेल्या टिळक या महापालिकेतील गटनेत्या राहिल्या आहेत. भाजप निष्ठावंत आणि पॅनलमधील चारही उमेदवारांचा विजय झाल्यामुळे टिळक पुण्याच्या महापौर होऊ शकतात.
 
काका-पुतण्याच्या वर्चस्वाला जबर धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला काबिज करण्‍याकडे भाजपची घोडदौड सुरु आहे. काका-पुतण्या अर्थात शरद पवार आणि अजित पवार यांच्या वर्चस्वाला जबर धक्का बसला आहे. अर्थात भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. 
भाजप 38, राष्ट्रवादी 24 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 6, अपक्ष प्रत्येकी 4 आणि मनसे 1 जागेवर विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अर्थात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. पुण्यात 77 जागांवर आघाडी घेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने 38 जागांवर आघाडी घेतली आहे.  दरम्यान, पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी 1,090 तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी 774 उमेदवार रिंगणात आहेत.

 
 
LIVE CHART: 
 
महापालिका शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे अपक्ष जागा
पुणे 12 89 11 30 01 05   162
पिंपरी- चिंचवड 09 78 00 35 01 06 128
 

UPDATES: 
- खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक.
-वंदना चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा
- खासदार सुप्रिया सुळे यांचे ट्वीट्स... सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

'आम्ही विनम्रतापूर्वक जनतेचा कौल स्विकार करतो. आम्हाला आत्मचिंतन करून पुनर्निर्मितीची गरज आहे.'
- शिवसेनेने बोलून पण भाजपने करून दाखवले... भाजप कार्यकर्त्यांच्या घोषणा
- पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
- 'पुण्याची ताकद, गिरीश बापट', अशा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
- पुण्यात मनसेने खाते उघडले, साईनाथ बाबर विजयी
-पारधी समाजाच्या राजेश्री काळे झाल्या नगरसेविका
-पिंपरी चिंचवड- 'राष्ट्रवादी'च्या महापौर शकुंतला धराडे (पिंपरी-चिंचवडच्या महापौर) यांचा पराभव त्यांच्या प्रभागात चारही भाजप उमेदवार विजयी
अ- सुनील अंघोळकर
ब -उषा मुंढे
क- शशीकांत कदम
ड- चंदा लोखंडे
- पुण्यात भाजपचा जल्लोष सुरु
- पुण्यात मुक्ता शैलेश टिळक यांचा 28050 मतांनी विक्रमी विजय.
- पुण्यात BJP ची सत्ता आल्यास मुक्ता टिळक होऊ शकतात महापौर
- पुण्याचे महापौर आणि त्यांची आई विजयी. 

-प्रभागात 2 जागांवर भाजपचा विजय
अ- धनराज घोगरे - भाजप
ब- कालिॆदा पुंडे- भाजप
क- रत्नप्रभा जगताप- राष्ट्रवादी
ड- प्रशांत जगताप- राष्ट्रवादी

पिंपरी-चिंचवड: NCP 17, BJP 12, SS 1, IND 1. 
पुणे-: BJP 33, NCP 13, Cong 4, SS 3, MNS 4, IND 5
प्रभाग १३ - पहिली फेरी - कर्वेनगर भाजप आघाडी - 

मंजुश्री खर्डेकर - ३८३८ 
माधुरी सहस्त्रबुद्धे - ४११६
दीपक पोटे - ३५३५ 
जयंत भावे - ३५८९
- पुण्यात बीएसपीची आश्चर्यकारक मुसंडी
प्रभाग क्रमांक २० पहिली फेरी 
अ -
बीजेपी- आरपीआय - विशाल शेवाळे ६७६ 
सेना - शंकर सोनवणे - २०५ 
एनसीपी - प्रदीप गायकवाड - २४६४
बीएसपी - सचिन शिंदे - २७०३
ब- 
बीजेपी - कल्पना बहिरट - ९२४
एमएनएस - पुनम शिंदे - २७२
काँग्रेस - चाँदबी नदाफ - २२४०
बीएसपी -सुमन गायकवाड - २९०३
क-
बीजेपी - शबाना शेख - १०५३
एमएनएस - उषा पवार - १३३
काँग्रेस - लता राजगुरू - १६४४
सेना -कविता सोनवणे - २११
ड -
बीजेपी - जमीन शेख - ६३९ 
काँग्रेस - अरविंद शिंदे - २०९८
सेना - रिझवान शेख १६२ 
बीएसपी - सुर्यकांत निकाळजे - २५९० 
पहिल्या फेरीत अरविंद शिंदे (कॉंग्रेस गटनेते आणि माजी स्थायी समिति अध्यक्ष) ४९२ मतांनी पिछाडीवर.
पुणे- प्रभाग १५ दुसरी फेरी
अ गट- हेमंत रासने, भाजप ३२३६, गणेश भोकरे, मनसे १४९४
ब गट- गायत्री खडके, भाजप ३५४६, रुपाली पाटील, मनसे २१००
क गट- मुक्ता टिळक, भाजप ३९१०
ड गट- राजेश येनपुरे, भाजप २८९६, आशिष देवधर, मनसे १०६२⁠⁠⁠⁠
- पुणे- NCP आनंद अलकुंटे, रुखसाना इनामदार विजयी
- पुणे- महापौर प्रशांत जगताप आघाडीवर (NCP)
-प्रभाग क्र 10 मध्ये चारही जागांवर भाजप पुढे.
- मनसेच्या जयश्री मारणे पिछाडीवर....
प्रभाग 10 बावधन -कोथरूड डेपो क- भाजपच्या अल्पना वरपे 3480  आघाडीवर
पुणे: प्रभाग क्र. 30 जनता वसाहत-दत्तवाडी राष्ट्रवादीच्या वैशाली चांदणे, प्रिया गदादे, अर्चना हनमगर आणि प्रेमराज गदादे आघाडीवर
-पुणे: भाजप पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले यांना 500 मतांची आघाडी
-पुणे: पहिल्या फेरी अखेर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या मुलाची पराभवाकडे वाटचाल 1024 मतांनी राष्ट्रवादी अघाडीवर
-पुणे: प्रभाग क्र. 7 मधून भाजपच्या राजश्री काळे आघाडीवर
-पुणे: प्रभाग क्रं. 24 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद आलकुंटे आघाडीवर 
पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवड

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विजयी उमेदवारांचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...