आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: पुन्हा धावली विनाचालक बस, भोसरीत चालकाचा निष्काळजीपणा पुन्हा चव्हाट्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोसरी येथील बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीची बस उतारामुळे अचानक वेगात रस्त्यावर धावत जवळील फुटपाथवर चढली. - Divya Marathi
भोसरी येथील बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीची बस उतारामुळे अचानक वेगात रस्त्यावर धावत जवळील फुटपाथवर चढली.

पिंपरी-चिंचवड- स्वारगेट येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच विनाचालक गाडी धावण्याच्या या घटनेमुळे पीएमपीच्या चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भोसरी येथील बीआरटी बस थांब्यावर चालकाविनाच पीएमपीची बस उतारामुळे अचानक वेगात रस्त्यावर धावत जवळील फुटपाथवर चढली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये दोन ते तीन दुचाक्यांचे नुकसान झाले. तसेच मोठी दुर्घटना टळली. 

 

आज मंगळवारी सकाळी पीएमपीची बस (MH 12- KQ 0210) जुन्नर-नारायणगावला जाणा-या एसटी बसच्या समोर असलेल्या बीआरटी बस थांब्यावर थांबली होती. या बसमध्ये चालक नव्हता. उतार असल्याने बस सुरू झाली. आणि सुसाट धावत थेट जवळच्या फूटपाथवर चढली. परिणामी परिसरात एकच गोंधळ उडाला. सकाळची ही वेळ मोठ्या वर्दळीची असते. अनेक पथारीवाले त्यांची दुकाने मांडत असतात. यावेळी ही बस अचानक धावत येताना पाहून सगळ्यांनी एकच पळापळ केली. चपलांचे दुकान मांडणारा एकजण बस खाली येता-येता थोडक्यात बचावला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत पळापळ केल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन-तीन दुचाक्यांचे नुकसान झाले. 

 

आजच्या घटनेत चालकाच्या निष्काळजीपणामुळे काही दुचाक्यांचे नुकसान होऊन एकाचा जीव थोडक्यात बचावला. तसेच मोठी दुर्घटना टळली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज...

बातम्या आणखी आहेत...