आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, 16 लाखांचा एवज जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चिंचवड येथील एम्पायर इस्टेटजवळील पिंपळे पेट्रोल पंपावर कर्मचार्‍यांना मारहाण करून तेथील 18 लाखांची रक्कम लुटणार्‍या दहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून आठ लाख 65 हजार रुपयांची रोकड व आठ लाख रुपये किमतीच्या गुन्ह्यातील पाच मोटारसायकल व एक फियास्ट कार जप्त करण्यात आली आहे.

अमोल सोमनाथ पाटील (29), अमोल प्रकाश मोरे (26), गणेश रघुनाथ ओव्हाळे (30), अभिजित माणिक मोरे (25), अनुराग मोहन ढमाले (19), आसिफ हबीब शेख (20), वाजिद इसाक कुरेशी (19), हाजिक आसिफ खान (19), सूर्यकांत शिवलिंग कानडे (25) व शाहिद गफ्फार खान (23) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी पेट्रोल पंपवरील कॅश ठरावीक दिवशी व ठरावीक वेळेत बँकेत भरणा करण्यासाठी जाते याची 15 दिवस निगराणी केली. त्यानंतर इस्टेट एजंट असलेले अमोल मोरे व अमोल पाटील यांनी दरोड्याचा कट आखला. त्यांना त्याबाबत विविध आयडिया गणेश अहिवळे याने दिल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हे पैसे लुटल्यानंतर त्याची आरोपींनी प्रत्येकाच्या कामानुसार विभागणी करून वाटप केले आहे. आरोपींचे पूर्वीचे गुन्ह्याचे कोणते रेकॉर्ड नसल्याने तपासात अडथळे आले, मात्र पोलिस हवालदार नासीर पटेल यांच्या खबर्‍याद्वारे आरोपींचा सुगावा लागला.