आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Police Arrested Five Students Of FTII, Student Organisation Launched Agitation

FTII च्या 5 विद्यार्थ्यांना मध्यरात्री अटक, डेक्कन पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओ- FTII संचालक प्रशांत पाठराबे यांना असा घेराव घालण्यात आला होता.)
पुणे- FTII चे नियोजित अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या निवडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना काल (मंगळवार) मध्यरात्री अटक करण्यात आली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी 17 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या विद्यार्थ्यांवर दंगल घडविल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या अटकेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटनेने पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरु केले आहे. आम आदमी पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी FTII संचालक प्रशांत पाठराबे यांनी 17 विद्यार्थ्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांनी संघटनेने या कृत्याचा निषेध केला आहे.
2008 या वर्षीच्या बॅंचच्या प्रोजेक्ट व्ह्यॅलुएशनला सोमवारपासून सुरवात झाली. त्यानंतर प्रोजेक्ट आहे तसे सादर करण्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली होती. पाठराबे यांच्या कार्यालयात तब्बल सहा तास ठाण मांडले होते. त्यानंतर याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली. पोलिस आल्यावरच पाठराबे यांची सुटका होऊ शकली होती.
पुढील स्लाईडवर बघा, अशी करण्यात आली FTII च्या विद्यार्थ्यांना अटक... यावर काय म्हणाले अरविंद केजरीवाल...