आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेणारी टाेळी अटकेत; अनेक बँकांना गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अाैरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, पनवेल, बारामती, मंचर, चाकण, सासवड, शिरूर अादी ठिकाणच्या बँकांना खाेटे नाव व बनावट कागदपत्रे बनवून लाखाे रुपयांचे कर्ज लाटणाऱ्या टाेळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पाेलिसांच्या गुन्हे शाखेला यश अाले अाहे. या प्रकरणी चार जणांच्या टाेळीला अटक करण्यात अाल्याची माहिती पाेलिस उपअायुक्त पी.अार.पाटील व सहपाेलिस अायुक्त सुरेश भाेसले यांनी दिली अाहे.   

सचिन भरत तिवडे (वय ३२, रा. पुणे, मु. रा. चिपरी, काेल्हापूर), रवि रामचंद्र झनके (४७, रा. पिंपळेगुरव,), माेझेस विल्यम मदनकर (३७, रा. काेंढवा), अमित प्रकाश त्रिभुवन (३६,रा. काेंढवा,पुणे) अशी अाराेपींची नावे अाहेत. सदर अाराेपींनी बनावट कागदपत्रे सादर करून विविध बँकांमधून सुमारे ९८ लाख रुपये कर्ज घेतले, मात्र त्याची परतफेड केली नाही.

खाेट्या कागदपत्रांद्वारे अशी फसवणूक करणारी टाेळी पुण्यात कार्यरत असल्याची माहिती पाेलिस निरीक्षक संभाजी भाेर्इटे यांना माहिती मिळाली हाेती. हे अाराेपी काेंढवा गावातील बसस्टाॅप जवळ एकत्र भेटणार असल्याचीही टीप मिळाली हाेती. त्यानुसार पाेलिस निरीक्षक नितीन भाेसले पाटील यांचे पथकाने सापळा रचून अाराेपींना अटक केली.    

फायनान्स मॅनेजर ते अाराेपी   
अाराेपी सचिन तिवडे याचेवर यापूर्वीही सात फसवणुकीचे गुन्हे दाखल अाहेत. दाेन वर्षांपूर्वी शिक्षा भाेगून ताे कारागृहातून बाहेर अाला अाहे. काॅमर्स पदवीधर असलेल्या सचिनने इंडिया बुल्स, अॅक्सिस बँक, सिटी फायनान्स बँक यामध्ये फायनान्शियल मॅनेजर म्हणून काम पाहिले अाहे. त्यामुळे बनावट कागदपत्राद्वारे कर्ज कसे मिळवायचे हे तंत्र त्याला अात्मसात हाेते. कर्ज मिळाल्यानंतर अाराेपी पैसे वाटून घेत हाेते. तिवडे याच्या बायकाेने सदर पैशातून पुण्यात ब्यूटीपार्लरही सुरू केले अाहे. तर दुसरा अाराेपी रवि झनके याचेवर २००१ मध्ये पुण्यातील पत्रकार प्रदीप थुंबे याचा खून केल्याचा गुन्हा दाखल अाहे.   
 
अाैरंगाबादेत फसवणूक
स्टेट बँक अाॅफ हैदराबाद शाखा बीड बायपास राेड शाखा व रेल्वे शाखा अाैरंगाबाद, स्टेट बँक अाॅफ हैदराबाद शाखा द्वारका नाशिक, अॅस्पायर फायनान्स शाखा दाैंड, स्टेट बँक अाॅफ इंडिया शाखा सासवड, स्टेट बँक अाॅफ इंडिया शाखा मंचर, देना बँक शाखा अहमदनगर, अायडीबीअाय बँक शाखा शिरूर, स्टेट बँक अाॅफ इंडिया शाखा संगमनेर, अॅक्सिस व स्टेट बँक अाॅफ इंडिया शाखा पनवेल, अॅक्सिस बँक विद्यापीठ शाखा पुणे, स्टेट बँक अाॅफ इंडिया शाखा हिंजवडी अशा बँकांमध्ये अाराेपींनी कर्ज घेतल्याची कबुली दिली अाहे. एकूण दहा प्रकरणांत त्यांना ९८ लाखांचे कर्ज मंजूर झाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...