आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री आर्शी खान सेक्स रॅकेटमध्ये सहभागी? 2 आधार कार्ड, 2 पॅनकार्ड सापडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील एका पंचतारांकित हाॅटेलमधील हायप्राेफाइल सेक्स रॅकेटचा पाेलिसांनी दाेन दिवसांपूर्वी पर्दाफाश करून अभिनेत्री व माॅडेल अार्शी खानची पाेलिसांनी दलालाच्या तावडीतून सुटका केली हाेती. सुधारगृहात पाठविल्यानंतर मात्र अार्शीने तिथून पळ काढला हाेता. दरम्यान, पाेलिसांना तिचे दाेन अाधार कार्ड, दाेन पॅन कार्ड सापडले असून (एक मीरा राेड मुंबई व दुसरे भाेपाळ) त्याची तपासणी केली जात अाहे.

या अाेळखपत्रांवरील जन्मतारखेत विसंगती असल्याचेही समाेर अाले असून अार्शीने याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे पाेलिसांचे म्हणणे अाहे. त्यामुळे पाेलिस तिच्या कागदपत्रांची शहानिशा करत अाहेत.

गुन्हे शाखेचे पाेलिस उपायुक्त पी. अार. पाटील म्हणाले, ‘अार्शी खान हिला पीडित महिला समजून काळजी व संरक्षणासाठी ताब्यात घेतले जाईल. तसेच कायदेशीर कारवाईची माहितीही तिला दिली अाहे. हाॅटेलवर छापा टाकल्यानंतर सुरुवातीपासूनच तिचे मॅनेजर, कायदेशीर सल्लागार, नातेवार्इक यांच्याशी तिचा संपर्क करून देण्यात अाला हाेता. सदर प्रक्रियेत तिच्याविरुद्ध काेणताही गुन्हा दाखल हाेणार नसल्याची माहिती तिला संबंधित पाेलिस अधिकाऱ्यांनी िदली हाेती. मात्र, याउपरही अापण पाेलिस ठाण्यात किंवा महिला सुधारगृहात जाणार नाही, असे सांगून तिने अारडाअाेरड केली हाेती. तसेच कायदेशीर प्रक्रियेत अडथळा अाणून पाेलिसांवरही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या या विचित्र वागणुकीच्या व्हिडिअाे क्लिप्स तसेच अाॅडिअाे रेकाॅर्डिंग पाेलिसांकडे उपलब्ध अाहेत.

अाराेपीशी संवाद
या प्रकरणात अाराेपी विपुल दहाल या दलालास अटक झाली अाहे. अार्शीचे यापूर्वी त्याच्याशी माेबाइलवर झालेले संभाषण व व्यावहारिक बाेलणी अाराेपी विपुलच्या माेबाइलमध्ये अाहे. यात देहव्यापाराशी संबंधित व्यवहाराची पुष्टी हाेत अाहे. तसेच अाराेपी विपुलने तिच्याशी व्हाॅटसअॅपवर अनेकदा बाेलणीही केल्याचे समाेर अाले अाहे, असे पाटील म्हणाले. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी अार्शीने पाेलिसांवर केलेले अाराेप बिनबुडाचे असल्याचे पाटील म्हणाले.

पुढील स्लाइवर वाचा, शाहिद आफ्रिदीची GirlFriend अर्शी खान या कारणामुळे होती चर्चेत....
बातम्या आणखी आहेत...