आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Police Busted Sex Racket At Hadapsar, One Arrest

पुणे: वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणा-या लातूरच्या दलालास पोलिसांकडून अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- परराज्यातून आणलेल्या अल्पवयीन मुलींसह तरूणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणा-या एका दलालास पुणे पोलिसाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. विलास कासले ऊर्फ विकास पाटील (वय- 26, रा. श्रीनगरी सोसायटी, साडेसतरा नळी, हडपसर, मुळगाव- देवणी, ता. उदगीर, जि. लातूर) असे अटक केलेल्या दलालाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका सोसायटीत परराज्यातून आणलेल्या तरूणींकडून पाटील जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याची माहिती पोलिस हवालदार नितीन लोंढे यांना खब-यामार्फत मिळाली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभाग व हडपसर पोलिसांनी सापळा रचून श्रीनगरी सोसायटीत छापा टाकला. यावेळी एका फ्लॅटमध्ये दोन तरूणी व एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले व विकास पाटील याला अटक केली. या तरूणींनी विकास आमच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी विकासकडे चौकशी केल्यानंतर त्यानेही कबूल केले. पोलिसांनी पाटील याच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, एपीआय निता मिसाळ, शितल भालेकर, गणेश जगताप, नितीन तेलंगे, नितीन लोंढे, दमयंती जगदाळे यांच्या पथकाने कारवाई केली.